जामडी तांडा परिसरात राजू पवार यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप मारेकऱ्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी जंगल परिसर पिंजून काढत कसून तपास केला आहे. तसेच संशयितांच्या हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्याप खुनाचा ठोस छडा लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी आज दि १६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केली आहे.