चोपडा: साकळी या गावातील भवानी मंदिर परिसरातील अल्पवयीन मुलास पळवून नेले, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Nov 20, 2025 साकळी या गावात भवानी मंदिर परिसरातील रहिवाशी विश्वजीत कोचुरे वय १५ हा अल्पवयीन मुलगा आपल्या घरी होता. दरम्यान त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.