तालुक्यातील मध्यभागी असलेल्या घुमडवार चौक हनुमान मंदिर मांढळ येथे मित्रमंडळी व स्थानिक रहिवाशांच्या वतीने गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा हनुमान मंदिर मांढळ येथे ह भ प विजय महाराज सेलोकर यांच्या हस्ते कीर्तन होऊन दहीहंडी फाडून गोपाल कला वितरण करण्यात आला. यावेळी महाप्रसाद चे वितरण करण्यात आले.