दारव्हा: शहरातीलकृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जळगाव येथे जैन इरिगेशन अभ्यास दौरा
स्थानिक नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कृषी महाविद्यालय, यांच्यावतीने दि. २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा जळगाव येथील जैन इरीगेशन उद्योग समूहात आयोजित करण्यात आला. प्राचार्य पंकज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात गिरीश कुलकर्णी व सुवंशीं यांनी मार्गदर्शन केले.