साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोदरा शेतशिवारा जवळून वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर शनिवार दि.20डिसेंबरला रात्री 7ला धाड टाकली असता रितेश गेडाम राहणार जांभळी सडक हा मोहफुलापासून दारू बनवण्यासाठी दहा प्लॅस्टिक ट्रममध्ये मोहफुल सडवा ठेवल्याचे आढळून आले या सडव्याची किंमत 60हजार रुपये असून हा सडवा जप्त करण्यात आला असून रितेश गेडाम यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे