महागाव: तालुक्यातील काळी दौलत शेत शिवारात बिबट्याचा बैलावर हल्ला, बैल जखमी, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
महागाव तालुक्यातील काळी दौलत शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बैल जखमी झाल्याची घटना आज दि.२ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली, महागाव तालुक्यातील काळी दौलत येथील शेतकरी बिरबल पवार यांच्या बैलावर बिबट्याने अचानक हल्ला करून जखमी केले. सदर घटनेमुळे शेतकऱ्यासह परिसरातील शेतकरी शेतमजूर भयभीत झाले आहे. सदर बिबट्याचा वनविभागाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.