देवळी तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हा परिषद शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे. "खेळाच्या माध्यमातून शिस्त आणि संयम शिका," असा मोलाचा संदेश यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. असल्याचे आज 17 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात कळविले आहे या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांनी बँड पथकाचे संचलन आणि कवायती सादर करत उपस्थितांची मने जिंकली.