हिंगणघाट:यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संपूर्ण हवालदिल झाले असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक कोंडीत सापडला आहे.शेतकर्यांंना या आर्थिक संकटातून दिला देण्यासाठी सरकारने अतिवृष्टी पॅकेजची घोषणा करून त्याची अंमलबजावणी केली आहे. शेतकरी सीसीआयला कापासाची विक्री करीत असून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा केले जात आहे.सरकारचा बँकांनी शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज कापु नये असे आदेश असताना बॅक कर्ज कापात हे ते बंद करा अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे.