बाभूळगाव: दिघी येथे शेतमजुराचा आकस्मिक मृत्यू,बाभुळगाव पोलिसात मर्ग दाखल
गुणवंत भगत हे आपल्या मित्रासह शेतामध्ये फवारणी करत असताना छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांनी झाडाखाली विश्रांती घेतली. काही वेळानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव येथे नेण्यात आले.परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच मृतकाचा भाऊ राहुल भगत यांनी बाभूळगाव पोलिसात तक्रार नोंदविली यावरून बाभुळगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला.