पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या बामणी येथे घरी कुणीही नसतांना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. घटनेची तकार पोलीस स्टेशन वेलतुर येथे देण्यात आली असुन तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.