बीडमध्ये एमआयएम पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले, शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
Beed, Beed | Nov 20, 2025 बीड शहरात आज ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या शक्तिप्रदर्शनाला तरुणाईचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागातून निघालेल्या या रॅलीमुळे वातावरण अक्षरश: महारॅलीमय झाले होते. जिल्हाध्यक्ष शैक्षणिक यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.