पायोनिअर सीड्स कंपनीचा उपक्रम; मका संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार वेध चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील गणेशपूर पिंपरी येथील प्रगतशील शेतकरी श्री. आनंद प्रभाकर मोरे यांची 'पायोनिअर सीड्स' कंपनीच्या वतीने आयोजित 'मेरे सपनों की उडान' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत हैदराबाद येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. एका सामान्य शेतकऱ्याची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन केंद्राच्या भेटीसाठी आणि ती देखील विमान प्रवासाद्वारे निवड झाल्याने संपूर्ण गावातून त्यांचे कौतुक होत आहे.