सोयाबीनची काढणी होऊन पंधरवड्यापेक्षा अधिक काळ उलटूनही नाफेडची शासकीय खरेदी सुरू न झाल्याने बाभुळगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे.तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वर्ग आता गंभीर आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन बाभूळगाव येथे सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र उघडण्याची मागणी केली.तसेच तत्काळ केंद्र सूरू न झाल्यास सहा नोव्हेंबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे...