भंडारा: शहरातील वैनगंगा नदी जलपर्यटन येथे आमदार भोंडेकरांनी साधला ज्येष्ठांशी 'चाय पे चर्चा' संवाद
भंडारा येथील वैनगंगा नदी जलपर्यटन स्थळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत 'चाय पे चर्चा' च्या माध्यमातून दि. २० नोव्हेंबर रोजी स. १० वा. दरम्यान मनमोकळा संवाद साधला. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात आमदार भोंडेकर यांनी ज्येष्ठांच्या अनुभवाधिष्ठित विचारांचे श्रवण केले. त्यांच्या अनुभवी विचारांनी आणि मोलाच्या मार्गदर्शनाने परिसरातील उपस्थित वातावरण अधिक समृद्ध आणि उत्साहवर्धक झाले. स्थानिक नागरिकांच्या अडचणी, विकास कामे आणि सामाजिक विषयांवर झालेल्या या चर्चेमुळे ज्येष्ठ नागरिका