भंडारा जिल्ह्यातील ढोरवाडा येथील रहिवासी दुर्गेश नामदेव बोंदरे (वय २६) याला ग्राममहसूल अधिकारी कोकोडे यांनी रेतीची अवैध वाहतूक करताना रंगेहाथ पकडले आहे. दि. २८/११/२०२५ रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास मौजा ढोरवाडा ते सुकळीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर हा आरोपी ट्रॅक्टर क्रमांक MH 36 AL 9487 व ट्रॉलीमध्ये १ ब्रास रेती (किंमत ₹ ६,०००/-) घेऊन जाताना आढळून आला. तहसीलदार यांच्या आदेशानुसार, फिर्यादी कोकोडे यांनी हा ट्रॅक्टर (अंदाजित किंमत ₹ ५,००,०००/-) व रेती असा एकूण ₹ ५,०६,०००/- किमतीचा.