डेंगी हा डासांमुळे पसरणारा आजार असून त्यापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणे आणि डासांचे निर्मूलन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करून घासून-पुसून कोरडी ठेवणे आवश्यक आहे. घरातील पाण्याची सर्व भांडी नेहमी झाकून ठेवावीत आणि झाकण नसल्यास स्वच्छ कापडाने झाकावे. डेंगीपासून संरक्षणासाठी घरातील खिडक्यांना जाळ्या लावणे आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे फायदेशीर ठरते. ताप आल्यास स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत; त्वरित डॉक्टर सल्ला घेणे गरजेचे आहे. तापात पूर्ण विश्रांती घेणेही आवश्यक आहे.