बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाचा व्यवस्थापक ढालेश्वर मदनलाल गोपचे यांना बेदम मारहाण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात बँकींग अधिकार्यांनी पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.