बेकायदेशीररित्या पाळीव प्राण्यांची कत्तल करून आलिशान मोटारीमधून गोमांस मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन निघालेल्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून गोमांस वाहतुकीसाठी वापरलेली आलिशान मोटर, ६५० किलो गोमांस, असा ३ लाख ७० हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला.