कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काही तुरळक घटना वगळता एकूणच आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत शांततेत मतदान प्रकिया पार पाडली. शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज स्थितीत कार्यरत होती. प्रभाग क्रमांक १२ मधील कन्या शाळेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व भाजप पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.