सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे ग्रामपंचायत कर्मचारी वसुलीचे काम करत असताना नायलॉन मांजाने दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. विकी पोपट जाधव व शिवशंकर खामकर अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे असून दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.