बदलापूर येथे मद्यपान करून एका दुचाकीस्वाराला गाडी चालवणे चांगलाच महागात पडल आहे. बदलापूर-कान्होर रस्त्यावर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून त्याला गंभीररित्या दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा दुचाकीस्वार मद्यपान करून गाडी चालवत होता. अचानक तोल गेल्यामुळे त्याचा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा सुरू केला व जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. हा संपूर्ण प्रकार आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास घडला आहे.