भंडारा: भिलेवाडा-करडी तिरोडा महामार्गावर निकृष्ट कामामुळे मृत्यूचे तांडव; तीव्र आंदोलनानंतर अखेर रस्त्याचे काम सुरू!
भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते करडी तिरोडा या महत्त्वाच्या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे गेल्या वर्षभरात सुमारे 15 ते 20 निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यामुळे परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. रस्ता रोको सारखे तीव्र आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर...