समुद्रपूर: वन्यप्राणी व मानवाचा संघर्ष रोखने सर्वांची जबाबदारी : वनपरिक्षेत्र अधिकारी गांवडे
समुद्रपुर: वनविभागाच्या वतीने जंगला शेजारी असलेल्या गावामध्ये वन्य प्राण्यांची व वनाची सुरक्षा तसेच मनुष्यांवर होणार वन्य प्राण्यांचे हल्ले यावर आळा घालण्यासाठी गिरडसह वनपरिक्षेत्रातील गिरड,खुर्सापार,भवानपुर मोहगांव, आर्वी याठिकाणी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे.या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे, सरपंच राजु नौकरकर, मोहगांवचे सरपंच विलास नवघरे, पत्रकार गजानन गारघाटे, पिपलफॉर यानिमलचे कौशिक गांवडे, यांनी मार्गदर्शन केले.