दि.9 जानेवारीच्या दरम्यान हिरडामाली येथे फिर्यादी पेमेंद्र बिसेन यांचा काके भाऊ राजेंद्र बिसेन हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 35 वी 7231 बजाज डिस्कवरने गोरेगाव वरून घरी हिरडामाली येथे परत येत असताना महिला आरोपी हिने आपल्या ताब्यातील मोपेड गाडी एमएच 35 एवी 0984 हे वाहन लापरवाहीने निष्काळजीपणे चालवून राजेंद्र बिसेध यांच्या मोटरसायकलला मागेहुन धडक दिल्याने ते जखमी झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 9 जानेवारी रोजी 1:30 वाजता गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.