गेवराई विधानसभा मतदार संघातील कुक्कडगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे महापुराने नुकसान झाले होते. त्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम नाम फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आले असून, आज बुधवार दि.17 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता, कुक्कडगाव येथे बंधारा दुरुस्ती व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शाळा खोली बांधकामाचा शुभारंभ आ.विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या का