अंबाजोगाई: अंबाजोगाईत काँग्रेसची आढावा बैठक संपन्न, अनेक पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित
अंबाजोगाई शहरातील नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली असून येत्या नगरपरिषद निवडणुकीतही काँग्रेसचाच विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आशीफोदिन खतीब बाबा यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात काँग्रेसतर्फे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत, आढावा घेतला