सर्वप्रथम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुक्ताईनगर येथे भेट देऊन संपूर्ण तालुक्यातील साथरोगांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली येथील पाहणी व आढावा* यादरम्यान, त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली येथे भेट देऊन पाहणी केली.यावेळी प्रामुख्याने साथरोगांचा सखोल आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी या रोगांच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारांसाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले.