तेल्हारा: पुरुष मतदारांवर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल
Telhara, Akola | Nov 30, 2025 माजी खासदार नवनीत राणा यांनी अकोल्याच्या तेल्हारा अकोट विधानसभा क्षेत्रात आपल्या प्रचारात दरम्यान वादग्रस्त विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी पुरुष मतदारांवर एक खळबळ जनक टिपणी केली आहे ज्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुरुष हे मतदानाच्या पार्ट्या खातात आणि रात्री उशिरा येतात मात्र महिला तशा नाहीत महिला या चटणी भाकर खाऊन आपला प्रपंच चालवतात असही माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर यावरचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.