कन्नमवार ग्राम जंगल परिसरात कळपासह गाय चरायला गेली असताना गुरख्याची नजर चुकवून रायपुर बीट 57 क्रमांकात वाघाने गाय हेरून गाईवर हल्ला करून ठार केल्याची घटना तारीख 29 ला भर दुपारी साडेअकरा बाराच्या सुमारास घडली गाईचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला गाय गाभण असल्याने मोठ्या प्रमाणात गोपालकाच नुकसान झाले आहे शेषराव आंबुडरे राहणार कन्नमवार ग्राम यांच्या मालकीची ही गाय होती वन विभागाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला असल्याची माहिती आज देण्यात आली आहे