भंडारा: दम असेल तर तुम्ही प्रकल्प आणा! आमदार नरेंद्र भोंडेकरांची विरोधकांना खुली चुनौती
भंडाऱ्यातील विकासकामांवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. “आम्ही केलेल्या कामाच्या पावत्या जनतेसमोरच आहेत. आम्हाला चौकशींची, आरोपांची भीती नाही. आमचा मार्ग हा सत्याचा आणि विकासाचा आहे,” असे वक्तव्य त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास प्रचारसभेत केले. भोंडेकर पुढे म्हणाले की, “कोणी आमच्यावर कितीही आरोप केले, गालबोट लावले तरी आम्ही विचलित होणार नाही.