कोपरगाव: समता पतसंस्थेबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीची कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेसची शहर पोलिसांकडे मागणी
समता पतसंस्थेबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला चार दिवसांपूर्वी दिले आहेत परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. सोमवारी तर समताच्या कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. करण्यात आली आहे.