चोपडा तालुक्यात मजरेहोळ हे गाव आहे. या गावातील रहिवाशी प्रभाकर तुमडू पाटील वय ७२ या वृद्ध इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.