पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथेअज्ञात चोरट्यांनी रस्त्या लगत सुरू असलेल्या महावितरण च्या तारेची चोरी करून ओमनी कार मध्ये चोरून नेताना गावकऱ्यांनी चोरट्यांना पकडले होते मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले याप्रकरणी गुरुवार रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान महावितरण ची लाखो रुपयाची ॲल्युमिनियमची तार चोरणारे चोरटे अद्याप फरार असून चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे