केज: चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सुवर्णकार संघटनेचे केज तहसीलदारांना निवेदन
Kaij, Beed | Nov 21, 2025 नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याच्या भीषण घटनने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत बीड जिल्ह्यातील केज येथे सुवर्णकार संघटनेच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी तहसीलदाराला निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत केज संघर्ष समितीनेही त्यांना पाठिंबा दिला.