छत्रपती संभाजीनगर : शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक करत त्याच्याकडून एकूण १४ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.