माहिती अधिकाऱ्यांतर्गत मागण्यात आलेली माहिती न देणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या अंगलट आली आहे माहिती अधिकाऱ्यांतर्गत मागितलेली माहिती ठराविक कालावधीत न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाने तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ओ.एन तुरकर यांना दोषी ठरवित 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे एकोडी येथील रहिवासी नामदेव मोहन बिसेन यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात झालेल्या संभाव्य भ्रष्टाचाराबाबत माहिती मिळावी यासाठी चार फेब्रुवारी 2022 रोजी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज दाखल होता