आर्णी: विठोली येथे अखेर बससेवा सुरू; ग्रामस्थांच्या दीर्घ संघर्षाला यश
Arni, Yavatmal | Dec 19, 2025 मौजा विठोली (ता. आर्णी) हे गाव इंटिरिअरमध्ये येत असल्यामुळे येथील प्रवासी व विद्यार्थ्यांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक दिवसांपासून बससेवा सुरू व्हावी, यासाठी विठोली येथील नागरिक सातत्याने प्रयत्न करीत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून विठोली येथे बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेसाठी दारव्हा डेपोचे व्यवस्थापक मा. श्री. निकेश उघडे यांनी विशेष सहकार्य केले. प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त