लाखनी: नगर परिषद निवडणुकीची धामधूम; शहरात चेकपोस्टवर भंडारा पोलिसांची कडक नजर
भंडारा जिल्ह्यातील चार नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून पोलिसांकडून वाहनांची काटेकोर तपासणी सुरू आहे. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपशीलवार तपासणी करून संशयास्पद वस्तू, रोख रक्कम किंवा अनधिकृत साहित्य वाहतूक रोखण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे.