कळमनूरी: वरुड तांडा बस स्टँड जवळून दिवसा ढवळ्या मोटार सायकल पळविली,आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील वरुड तांडा येथील ज्ञानेश्वर विलास आडे यांनी मोटरसायकल क्रमांक एम एच 38 ए जी 5285 ही तेथील बस स्टँड जवळ दि.24 नोव्हेंबर दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास उभी करून ठेवली होती अज्ञात चोरट्यांनी क्षणातच विलंबन न लावता ती लंपास केली आहे .याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत .