धुळे: जागतिक एड्स दिनानिमित्त साक्रीरोड जिल्हा रुग्णालयातून भव्य सायकल रॅली; जनजागृतीसाठी धुळेकर एकवटले!
Dhule, Dhule | Dec 1, 2025 जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे साक्री रोड येथील जिल्हा रुग्णालयातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली. ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्हीला लढा देऊ’ या संदेशावर आधारित रॅलीला डॉ. दत्ता देगावकर व ॲड. ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रारंभ केला. साक्री रोडवरून गुरु-शिष्य चौक, टॉवर बगीचा, १२ पत्थर मार्गे फिरून रॅली रुग्णालयात परतली. याचद्वारे १ ते १५ डिसेंबरदरम्यानच्या ‘एड्स जनजागृती पंधरवड्या’ची सुरूवात झाली.