चाळीसगाव (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यावहारिक शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने जिल्हा परिषद उर्दू शाळा, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथे शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी 'बाल आनंद मेळावा' (फूड फेस्टिव्हल) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे धडे गिरवत विविध चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानीच ग्रामस्थांना दिली.