भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज अचानक एका कारला आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे स्टेशन जवळून कार जात असताना अचानक धूर येऊ लागला आणि लगेचच आगीच्या ज्वाळा उसळल्या. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली