आज सोमवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद गटातून ललिता सुरेश सोनवणे या उमेदवाराने शिवसेना ठाकरे गटातून बाजी मारली आहे, विशेष म्हणजे या अगोदर भाजपच्या तिकिटावरती निवडून आल्या त्या मात्र यावेळी भाजपने त्यांची टिकीट कापले होते, ललिता सोनवणे यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती आणि आता त्यांनी वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद गटातून मोठा विजय प्राप्त केला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.