आज दि 19 जानेवारी दुपारी 3 वाजता हैदराबाद गॅझेटनुसार नूसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाने गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने आंदोलन सुरू ठेवले आहे. राज्यातील विविध ठिकाणी मोठे मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशन व नगराध्यक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णयासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र, दिलेला कालावधी संपूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.