शिरपूर: शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूकसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात,उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली माहिती
Shirpur, Dhule | Nov 30, 2025 शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूकसाठी घेण्यात येणाऱ्या मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी व पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 मतदान केंद्रासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला.त्यात 1 उपविभागीय पोलिस अधिकारी,1 पोलीस निरीक्षक,3 एपीआय,7 पीएसआय या पोलिस अधिकाऱ्यांसह 106 पोलीस अंमलदार,144 होमगार्ड, आणि 1 आरसीबी पथक व 2 एसआरपीएफ प्लाटून यांची पोलीस बंदोबस्तसाठी नियुक्त करण्यात आले.