राहुरी: राहुरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था;माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे तातडीने दुरुस्तीचे आदेश
राहुरी शहराअंतर्गत असलेल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द लक्षात ठेवून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती सुरू करावी, अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. सोमवारी दुपारी राहुरी नगरपालिकेत झालेल्या बैठकीदरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुख्याधिकारी हराळ यांच्याशी चर्चा करत शहरातील खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधले.