अंबरनाथ: बदलापूर मधला राजकारण तापलं, ठाकरे गटाच्या कार्यालयावरील बॅनर फाडले
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर मध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली होती आणि त्यामध्ये प्रमुख नाव होतं ते वैभव सदाफुले यांचं. तसेच ठाकरे गटाच्या माध्यमातून ही तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली होती व कार्यालय देखील सुरू करण्यात आले होते. मात्र अचानक सदाफुले यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. मात्र आत ठाकरे गटाच्या कार्यालयावरचे बॅनर फाडले असल्याचा आरोप सदाफुले यांच्यावर होत आहे. या संदर्भातली माहिती आज १ डिसेंबर रोजी दुपारी १२च्या सुमारास मिळाली.