हरसूल येथे श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा चे आयोजन करण्यात आले.यावेळी संत श्रेष्ठ श्री संताजी महाराजांची सजवलेल्या रथामध्ये शोभायात्रा काढण्यात आली.शोभा यात्रे मध्ये हरसूल व परिसरातील भजनी मंडळींनी टाळ मृदगाच्या गजरात भजन गात अग्रभागी होते.तर हभप गोडंबाबाई देवरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कर्त्या महिला वारकरी भक्तांनी डोक्यावर ग्रंथ घेऊन शोभायात्रे मध्ये सहभागी झाल्या.