मराठी पत्रकारितेचे जनक स्व. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रेस क्लब दारव्हा यांच्या वतीने प्रा. वसंत हंकारे यांचे “न समजलेले आई-बाबा” या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता, नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.