15 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री शाहू वय 22 वर्ष ही तिच्या दुचाकीने वाठोडा चौक येथून जात असताना तिला ट्रक ने जोरदार धडक दिली. आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. तिला उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे याप्रकरणी संदीप शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.